Saturday, October 15, 2011

मिडीया ... मास्टर की मॉन्सर्ट

मराठी माणुस , अस्मिता , स्वाभिमान , संस्कृती हे शब्द तसे नवीन नाहीत ... पण गेल्या काळात हे शब्द पुन्हा चर्चेत आलेत त्याला कारण ठरला राज ठाकरे यांचा पक्ष , महाराष्ट्र नवनिर्माण सेना .... मराठी तरुणानं हातात दगड उचलाला आणि ठाणे रेल्वे स्थानकावर घडला प्रकार काही माध्यमांच्या प्रतिनिधीना मिळाला .माध्यमं नेहमी ज्या खाद्याच्या शोधात असतात ते खाद्य माध्यमांना मिळालं , मुद्दा राष्ट्रीय पातळीवर पोहचला ..... हिंदी भाषिक माध्यमांनी राज ठाकरे यांच चित्र खलनायकी उभं केलं तर मराठी माध्यमांनी मराठी माणसाचा रॉबिन हुड म्हणुन .....

Positive or negative, publicity is publicity या तत्वाला धरुन राज ठाकरे एका रात्रित राजकिय पटलावरचे हिरो झाले . राष्ट्रीय नेतृत्व , बालासाहेबांना पर्याय किंवा मिरर इमेज म्हणून ही काहीनी चित्र उभं केलं. हिंदी भाषेत एक म्हणं आहे " बोतलसे जीन बाहर निकालना असान होता है ... बोतल मे वापिस डालना बडा ही मुश्किल " माध्यमांनी याचा विचार मात्र केलेला दिसत नाही .... म्हणुनचं म्हटलं गेलं हा माध्यमांनी उभा केलेला मॉन्स्टर..

या निमित्तानं एक किस्सा आठवतो राज ठाकरे यांच्या समवेत काही वृत्तवाहीन्याचे तरुण प्रतिनिधी आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी नेहमी प्रमाण काही बातमी मिळेंल म्हणुन गप्पा मारत होते राज आपल्या शैलीत सिगारेटला फिल्टर लावुन धुर हवेत सोडत होते . चर्चा वृत्तवाहिन्यांची बातमीदारी या विषयावर पोहचली होती . राज यांनी या माध्यमात खुप ताकद आहे या माध्यमांनी ठरवलं तर देशात क्रांती होऊ शकते . बरचं काही होउ शकतं असा मार्गदर्शनातचा डोस पाजला ... तितक्यात एक वरिष्ठ पत्रकार म्हणाला " हो गेल्या काळात याच वाहीन्यांनी होत्याचं नव्हत केलं ना " दोघांचीही मतं योग्यचं होती .

राज ठाकरे व्यंगचित्रकार जे जे महाविद्यालयातील कमर्शियल चे विद्यार्थी , इथं शिकवलं जातं माध्यमं कसं वापरावं ... राज यांनी कला माहाविद्यालयातचं शिक्षण पुर्ण केलं नसलं तरी त्यांना माध्यमांचा वापर योग्य़ पघ्दतीनं जमतो हे मान्य करावचं लागेल .
" मॉन्स्टर " इंग्रजीतला हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल ..यातला मॉन्स्टर हा माणसाळलेला ... एक लहाग्याला मदत करणारा त्याचा मित्र .. मॉस्टर असाही असु शकतो त्याला कोणता संस्कार दिला जातो त्य़ावर त्याचं वागण, बोलणं ठरतं असतं ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हा राज ठाकरे यांनी अशाचं चागल्या राजकिय पक्षाचं स्वप्नाळु सकारात्मक चित्र उभं केलं . काही काळ सकारात्मक कामही करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसिध्दी काही मिळाली नाही ... मग रेशनिंगचं आंदोलन मनसेनं हाती घेतलं , रेशनिंग दुकानांना टाळ ठोकण्यात आली . पक्ष माध्यमांच्या , प्रसिध्दीच्या झोतात आला ... राज ठाकरेनी माध्यमा बाबतची ही खंत तेव्हाही बोलुन दाखवली. राज ठाकरे आणि त्याच्या पक्षाला , आता किरकोळ हाणामारीतुन बरचं काही मिळालय . राष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमाही तयार झालीय आता माध्यमांच्या कॅमेरांच त्याच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष असणार आहे , पर्यायानं त्यांना आणि त्यांच्या पक्षाला प्रसिध्दीही मिळणारं आहे ... पण नवनिर्माणाचं काय ?

राज ठाकरे यांनी अटक झालेल्या मनसे कार्यकत्यांचं शिक्षित मराठी तरुण असं वर्णन केलं , या तरुणानी दगड उचलले ते त्याच्या न्याय हक्कासाठी यामाध्यमातून मराठीचं चलनी नाणं राज ठाकरे यांच्या हाती लागलं .

राज यांनी मराठी पाट्या , रेल्वे भरतीत मराठी टक्का या गोष्टीची जाणीव मराठी माणसाला करुन दिली , घडल्या प्रकाराची संसदेत चर्चाही झाली पण या पुढे काय ? अशाच हाणामा-या की काही सकारात्मक कार्यक्रमही असेल ?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना येत्या काळात महाराष्ट्रातल्या ३५०० कॉलेजेस च्या माध्यमातुन रेल्वे भरतीच्या जाहराती मराठी विद्यार्थानं पर्यत पोहचवेल का ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे शाखा प्रमुख आपल्या वॉर्डातल्या फलकांवर भरतीच्या जाहीराती लावतील का आणि स्थानिक मराठी विद्यार्थाना परिक्षेला बसायला प्रवृत्त करतील का ?
गणेश उस्तव आणि नवरात्रीला गोळाहोणा-या वर्गणीत पक्षाच्या नेत्यांचे त्याच्या उंची पेक्षा मोठे कटआउट लावण्या एवजी त्या पैशातुन स्पर्धा परिक्षाना कसं सामोरं जाव याचं प्रशिक्षण मराठी तरुणांना देणार का ?

माध्यमं प्रतिमा उभी करतात , पणं माध्यमांनी उभ्या केलेल्या प्रतिमांना भलणारा मराठी माणुस नाही हे ही वास्तव विसरता कामा नये ....

No comments:

Post a Comment